गावाबद्दल माहिती


बार्शी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या नागझरी नदीच्या तीरावर वसलेले 2200-2300 लोकवस्ती असलेले राळेरास हे गाव. अनेक राज्य आणि केंद्र पुरस्कार प्राप्त असलेल गाव. गावात अनेक पुरातन मंदिर प्रेक्षणीय असून नैसगिक दृष्टीने सुखसमृद्ध आहे.

1952 साली राळेरास ग्रामपंचायत ची स्थापना करण्यात आली. दिगंबर सोपान पंके हे राळेरास ग्रामपंचायतचे पहिले सरपंच होते. गावाचे संपूर्ण भौगोलिक क्षेत्रफळ ३४३ हेक्टर एव्हडे आहे. गावामध्ये एकूण 700 च्या वरती घरे आहेत. २०१९ च्या आकडेवारीनुसार राळेरास गाव बार्शी विधानसभा मतदार संघात येत. बार्शी हे राळेरास गावासाठी जवळचे शहर आहे ते अंदाजे 30किमी एव्हड्या अंतरावर आहे. गावातील बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे त्यासोबत दुग्धव्यवसाय हा जोडधंदा म्हणून केला जातो

जवळपासची गावे : शेळगाव(आर), वैराग, धामणगाव, सासुरे, कौठाळी, सर्जापूर.



लोकसंख्याशास्त्र
ग्रामपंचायत राळेरास
सदस्य संख्या
सरपंच सौ. पंके चंद्रकला प्रकाश
उपसरपंच कु. निचळ संकेत नामदेव
सोसायटी चेयरमन श्री पांडुरंग चांगदेव निचळ
सोसायटी व्हॉइस चेयरमन श्री मारुती लक्ष्मण भोसले
तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदीपान भोसले
ग्रामसेवक श्री गोपाळ निवृत्ती गुघे
पोलीस पाटील श्री गणेश भोसले (पाटील)
ग्रामपंचायत कर्मचारी श्री समाधान प्रकाश कोळी
पाणी पुरवठा श्री अनिल रामचंद्र भोसले
लोकसंख्या
एकूण कुटुंब २८०
स्त्रिया 1125
पुरुष 1293
एकूण 2316
शेती नसणारे कुटुंब 50
अन्य माहिती
जि.प. शाळा (१-4) 2
माध्यमिक शाळा (5-10) 1
अंगणवाडी 4
समाज मंदिर
साक्षर सांख्यशास्त्र
इंजिनिअर 60*
डॉक्टर 6
व्हेटरनरी डॉक्टर 7
वकील
शिक्षक 20
भारतीय सैन्य 25
भारतीय नौदल 6
नोकरदार 300*
व्यावसायिक 50*
आमदार 0
खाजदार 0

गावाला मिळालेले पुरस्कार

सत्यमेव जयते वॉटर कप

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा पाया हा ज्ञान आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थीना 'पानी फाऊंडेशन’ पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच हे गावकरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेतात. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करतात. सत्यमेव जयते वॉटर कप 201८’ स्पर्धेत एकूण ७५ तालुक्यानी सहभाग घेतला होता. ‘पाणी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुकास्तरावर आपल्या राळेरास गावाने तृतीय क्रमांक (रक्कम ३,००,००० रुपये) मिळवला.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली. गावाचा विकास गावातच झाला पाहिजे तसेच त्या त्या गावातील प्रश्न देखील त्याच ठिकाणी सोडवता आले पाहिजेत ही बाब लक्षात घेऊन, गावकर्यांनीं सर्व भांडण-तंटे सामोपचाराने गावातच मिटवले म्हणून २०१७ साली राळेरास गावाला शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा पुरस्कार(रक्कम २,००,००० लाख रुपये) देण्यात आला.

पूर्ण झालेली कामे (२०२३-२०२४ - १५ वित्त आयोग)

अ. क्र. दिनांक झालेली कामे निधी छायाचित्रे
1 14.11.2023 झोपडपट्टीवरील सर्व नळाला वॉल व तोटी बसवणे
(22000+70300)
93,300 NA
2 16.05.2023 ३ बोरवेल पंप दुरुस्त करणे (आडावरील, गणपतीजवळील, नदीतील)
३ स्टार्टर आणी व्होल्टमीटर
पंडित निचळ येथे पाईपलाइन
नाना आवटे ते झोपडपट्टी शाळा पाईपलाइन
नदीतील बोर ते वॉटर सप्लाय विहीर पाईपलाइन
नदीतील बोर साठी केबल
आडावरील बोर ते मातंग समाज पाईपलाइन
जानेवारी ते जून २०२३ - गावातील पाईपलाइन दुरुस्ती
(130000/- + 70000/-)
2,00,000
3 16.05.2023
25.05.2023
बंदिस्त गटार करणे DP
लेंडीतील गावात जातानाच्या रस्त्याची ३ फीट व्यासाचे पाईप
289000+10000
2,99,000
4 16.06.2023 काळुके गल्ली, सुनील पंके ते पोस्टमन घर, सज्जन जाधव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे
180000 + 70000
2,50,000
5 27.10.2023 झोपडपट्टी शाळा बाथरूम दुरुस्ती 50,000
6 27.10.2023 गावातील मराठी शाळा आणि अंगणवाडी येथे वॉटर फिल्टर, इलेक्ट्रिक मोटर, सिंटेक्स , वॉटर लाईन कनेक्शन फिटिंग 50,000
7 2.05.2023 चार सार्वजनिक सौचालय अंगणवाडीजवळ (ग्रामपंचायत काँट्रीब्युशन १५ वा वित्त आयोग मधून) 96,000
8 22.02.2024 सांडपाणी व घनकचरा वव्यस्थापन 80000 + 188760 (ग्रामपंचायत काँट्रीब्युशन १५ वा वित्त आयोग मधून) 2,68,760
9 20.02.2024
22.02.2024
26.02.2024
बंदिस्त गटार करणे गोसावी गल्ली,
प्रल्हाद भोसले बॅक साईड गटार करणे,
लेंडीतील बाकीची राहिलेली पूर्ण आणि जॉईन केली
(123228+123228+123228)
3,69,684

Online दिसत नसणारी कामे-२०२३-२०२४ (१५ वित्त आयोग सोडून)

अ. क्र. दिनांक झालेली कामे निधी छायाचित्रे
1 दहिटणे रस्ता ते ग्रामपंचायत कार्यालय १२ फीट रुंद काँक्रेट रोड 9,18,036
2 चार सार्वजनिक सौचालय अंगणवाडी शेजारी (ZP contribution) 1,94,730
3 लालासाहेब शेरखाने ते रवींद्र शेरखाने व मातंग वस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसवणे 1,81,500
4 सांडपाणी व घनकचरा वव्यस्थापन (स्वच्छ भारत मिशन ZP contribution) मोठा कंपोस्ट खत खड्डा ३ छोटा कंपोस्ट खत खड्डा ५ प्लास्टिक waste शेड १ मोठे शोष खड्डे १० छोटे शोष खड्डे (घरासाठी) १८ 6,27,228

पूर्ण झालेली कामे (२०२४-२०२५ - १५ वित्त आयोग)

अ. क्र. दिनांक झालेली कामे निधी छायाचित्रे
1 18.08.2024 जुनी अंगणवाडी येथे नवीन बोअर २ बोरवेल पंप दुरुस्ती (गणपती, नदीतील) ३ स्टार्टर आणि व्होल्टमीटर २.५ इंच पाइपलाइन ६०० फीट नव केबल मुन्ना सर विहीर ते वॉटर सप्लाय विहीर जुलै २३ ते ऑगस्ट २४ गावातील पाइपलाइन दुरुस्ती (२००३९७+९००००) 2,90,397
2 18.08.2024 हरिदास पंके ते मुरकुटे गल्ली पेव्हर ब्लॉक बसवणे 2,26,000
3 16.05.2023-25.05.2023 बंडेवार विहीर बंधारा दुरुस्ती, खोलीकरण, दगड लावणे 3,00,070
4 16.05.2024-20.05.2024 संकेत निचल शेताजवळ नवीन गॅबियन बंधारा करणेसाठी 2,07,949
5 20.05.2024 Majuri 3000 NA
6 27.06.2024 Rasta durusti Sajjan Panke 5000 NA
7 29.05.2024 पथदिवे लावणे मजुरी 5500 NA
8 30.05.2024 लोकसभा जेवण व नाष्टा खर्च 4100 NA

सध्याचे ग्रामसदस्य(पॅनल)

सौ. पंके चंद्रकला प्रकाश

सरपंच

कु. निचळ संकेत नामदेव

उपसरपंच (वॉर्ड क्रमांक १)

श्री गोसावी बाळपुरी दत्तबुवा

सदस्य (वॉर्ड क्रमांक १)

सौ. गुडे मनीषा सुभाष

सदस्य (वॉर्ड क्रमांक १)

सौ. पंके स्नेहा भाऊसाहेब

सदस्य (वॉर्ड क्रमांक २)

शेरखाने सुरेखा प्रकाश

सदस्य (वॉर्ड क्रमांक २)

श्री धनंजय विश्वासराव भोसले

सदस्य (वॉर्ड क्रमांक २)

सौ. जाधव सुरेखा रणजीत

सदस्य (वॉर्ड क्रमांक ३)

सौ. भोसले सरोजिनी युवराज

सदस्य (वॉर्ड क्रमांक ३)

श्री मिलिंद नागनाथ शेरखाने

सदस्य (वॉर्ड क्रमांक ३)

आताची मंजूर झालेली कामे


अ. क्र. मंजूर झालेले काम मंजूर झालेला निधी
राळेरास गावामध्ये दोन मराठी शाळा २० लाख
एक मराठी शाळा गांधी वस्ती वर १० लाख
दुसरा काँक्रेट रोड DP ते ग्रामपंचायत १० लाख
काँक्रेट रोड हरिदास पंके ते मारुती मंदिर ८ लाख
नवीन ग्रामपंचायत ऑफिस साठी २५ लाख
दलित वस्तीमध्ये सभागृह 20 लाख
7 २ किलोमीटर पाणंद रस्ता 30 लाख
8 १५ वित्त आयोग चे १० लाख

मागील सरपंच व त्यांचा कार्यकाळ


सरपंचाचे नाव कार्यकाळ
मधुकर नारायण पंके २०१७-२०२२
जयश्री भास्कर गोसावी २०१२-२०१७
अंजली मेघश्याम भोसले २००७-२०१२
शिवाजी भगवान शेरखाने २००२-२००७
विष्णू विठ्ठलराव भोसले १९९७-२००२
सुरेश रामराव पंके १९९२-१९९७
आनंदराव भीमसेन पंके १९८७-१९९२
राजाराम शंकरराव भोसले १९८५-१९८७
सुभाष कोंडीबा निचळ १९८२-१९८५
दगडू राणू शेरखाने १९७७-१९८२
यशवंतराव हनुमंतराव पाटील १९६७-१९७७
दिगंबर सोपान पंके १९५२-१९६७

गुगल लोकेशन

राळेरास हे गाव बार्शी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या वैराग शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.


premium bootstrap themes

 आदर्श गाव राळेरास,

ग्रामपंचायत राळेरास,
पोस्ट - राळेरास तालुका - बार्शी,
जिल्हा - सोलापूर पिन कोड - ४१३४०२